कोरेगावमुळ येथील कोव्हीड सेंटरला भानुदास जेधे युवा मंचच्या माध्यमातून हापूस आंब्याच्या ५०० पेट्यांचे वाटप

कोरेगावमुळ-कोरोना महामारीमध्ये संपुर्ण समाज कोलमोडून गेला आहे. बाहेर कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता. समाज चिंतेत व अडचनीत आहे. सामाजीक बांधीलकी म्हणून व त्या जाणीवेतून त्या पार्श्वभूमिवर उद्योगपती आदर्श व्यक्तीमत्व कोरेगाममुळचे ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे यांच्या माध्यमातून ग्रहउपयोगी वस्तु बरोबर इतर महत्वपुर्ण छोटी मोठी मदत सतत कोरेगावमुळ मधील जनतेला होत आसून आमदार अशोक पवार व जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार याच्या संकल्पनेतून तयार झालेल प्रतिभा अरोग्य मंदीर यशोदा मंगल कार्यालय कोरेगावमुळ येथील कोव्हीड सेंटरला त्यांच्या भानुदास जेधे युवा मंच कोरेगावमुळच्या माध्यमातून विविध मदत केली जात आहे व पुढेही होत राहणार आहे. तसेच कोरोना काळात अक्षयतृतीया निमित्त स्पेशल देवगड हापूस आंब्यांच्या ५०० पेट्या कोरेगावमुळ मधील सर्व सामान्य माणसाला सप्रेम भेट म्हणून दिल्या आसून कोरोना काळात कोणाला कशाची हि गरज पडली तरी त्यांना मी पुर्ण मदत करेल अशी खात्री त्यांनी दिली.

 

या प्रसंगी कोरेगावमुळचे सरपंच विठ्ठल शितोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक बापूसाहेब बोधे करत आसून त्यांच्या समाजउपयोगी कामात सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधीकारी संंतोष गायकवाड, उद्योजक सुहास चौधरी, मंगेश शितोळे, महेश शिंदे, दिलीप शितोळे, आप्पासाहेब कड, आमित सावंत, प्रविण शितोळे, महेंद्र शितोळे, अमोल भोसले व उरुळी कांचन पंचक्रोशी मधील हँप्पी ग्रुपचे सदस्य सर्वेतोपरी मदत करत आहेत

Previous articleगावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या दोघांना चाकण पोलीसांनी बेड्या ठोकल्या
Next articleकोविड केअर सेंटरमध्ये पोलीस मिञ संघातर्फे फळवाटप