महा एनजीओ फेडरेशनच्या कार्याच्या अवहालाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

अमोल भोसले,उरुळी कांचन

महा एनजीओ फेडरेशन च्या मागील कोरोना जन्य परिस्थितीत केलेल्या सेवा कार्याचे प्रकाशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे झाले.

या वेळी महा एनजीओ फेडरेशन च्या विविध सेवा उपक्रमा विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. स्वयंसेवी संस्थांनी शासकीय योजना व सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणे गरजेचे आहे. तसेच लोक कल्याणकारी उपक्रम व खरे लाभार्थी यांच्यातील अंतर कमी करण्याचे काम सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून घडावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. फेडरेशन द्वारे सुरू असलेल्या आत्मनिर्भर ग्राम अभियान, रोजगार निर्मिती या उपक्रम व पुढील वाटचालीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी महा एनजीओ फेडरेशन संस्थापक शेखर मुंदडा, सह संस्थापक विजय वरूडकर, संचालक मुकुंद शिंदे, गणेश बाकले, अक्षय महाराज भोसले, अमोल उंबरजे, शशांक ओंबासे उपस्थित होते.

Previous articleराजेगाव येथे वृक्षारोपण
Next articleमहाळुंगे – बिरदवडी रस्त्यावरील विजेचा खांब वाकला ; वीज कंपनीचे दुर्लक्ष