महाळुंगे – बिरदवडी रस्त्यावरील विजेचा खांब वाकला ; वीज कंपनीचे दुर्लक्ष

महाळुंगे – बिरदवडी रस्त्यावरील दवणेमळ्या जवळ विजेचा खांब पुर्णपणे वाकलेला दिसुन येत आहे.चाकण-तळेगाव रस्त्यावर नेहमी गर्दी असते त्यामुळे मधल्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी या रस्त्यावर वाढली आहे. त्यामुळे वाहनाचा खांबांला धक्का लागला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

ह्या रस्त्यावर विजेचा खांब झुकलेल्या अवस्थेत असून हा विजेचा खांब कोसळू शकतो दिवस रात्र वाहनाच्या वर्दळीचा रस्ता त्यात एखादी दुर्घटना झाली तर अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते महावितरण विभागाने हा विजेचा खांब तत्काळ बदलून नवीन खांब येथे उभा करावा या कडे महावितरण कंपनिचे दुर्लक्ष दिसुन येते आहे.

 

या विद्युत खांबापासून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे त्यामुळे तारांना तारा लागून वाकलेल्या खांबा मुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकरता येत नाही.हा धोकादायक खांब काढण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.

Previous articleमहा एनजीओ फेडरेशनच्या कार्याच्या अवहालाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
Next articleविहिरीत पडलेल्या बिबट्याचे वाचवले प्राण ; वनविभागाच्या प्रयत्नांना यश