सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आठ डिसेंबर रोजी होणार..

सिताराम काळे,घोडेगाव

सिताराम काळे, घोडेगाव- आंबेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती आंबेगाव कार्यालय घोडेगाव येथे सोडत काढण्यात येणार असल्याचे आंबेगाव तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील दि. ५ मार्च २०२० ते ४ मार्च २०२५ या कालावधीतील वडगांव पीर, विठ्ठलवाडी, पोंदेवाडी, लाखणगांव, देवगांव, अवसरी खुर्द, मंचर, शेवाळवाडी, खडकवाडी, गावडेवाडी, साकोरे, भागडी, एकलहरे, वडगांव काशिंबेग, चिंचोली, खडकी, पिंगळवाडी-लांडेवाडी, कोळवाडी-कोटमदरा, कारेगांव, पेठ, म्हाळुंगे पडवळ, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, भराडी, वळती, लौकी, शिरदाळे, जवळे, फदालेवाडी-उगलेवाडी, काठापुर, शिंगवे, गिरवली, थुगांव, काळेवाडी-दरेकरवाडी, रानमळा, धोंडमाळ-शिंदेवाडी, कोलदरा-गोनवडी, आंबेगाव गावठाण, माळीण, शिनोली, तिरपाड, आसाणे, कोंढवळ, थोरांदळे, ढाकाळे, गंगापुर बु., पिंपळगाव तर्फे घोडा, राजपुर, राजेवाडी, पोखरी,
पांचाळे बु., जांभोरी, आहुपे, तळेघर, डिंभे खुर्द, घोडेगाव, साल, आंबेदरा, आमोंडी, गंगापुर खुर्द, चिंचोडी, चांडोली बु., कळंब, पारगावं तर्फे खेड, मेंगडेवाडी, धामणी, भावडी, नारोडी, गोहे खुर्द, निघोटवाडी, रांजणी, लोणी, फलोदे, कुशिरे बु., कोलतावडे, कानसे, गोहे बु., तळेकरवाडी, चांडोली खुर्द, अवसरी बु., निरगुडसर, पहाडदरा, पारगांव तर्फे अवसरी बु., जारकरवाडी, चास, ठाकरवाडी, वाळुंजनगर, पाटण, टाव्हेरेवाडी, चपटेवाडी, सुपेधर, फुलवडे, डिंभे बु., टाकेवाडी, तांबडेमळा, चिखली, पिंपरगणे, कुरवंडी, नागापुर, म्हाळुंगे तर्फे घोडा, मांदळेवाडी, नांदुर बोरघर व जाधववाडी या १०३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या सरपंच पदाकरीता आरक्षणाची सोडत होणार आहे. सदर आरक्षण दि. ८ डिसेंबर रोजी प्रथम सत्रामध्ये अनुसूचित क्षेत्रातील ३६ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यानंतर ६७ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत हुतात्मा बाबू गेनू सभागृह पंचायत समिती आंबेगाव कार्यालय घोडेगाव येथे काढण्यात येणार असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

Previous articleअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या ग्राम शाखेची अजिवली येथे स्थापना
Next articleमराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन