मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन –

देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ वर्धापनदिनाच्या निमित्ताने हवेली तालुका पत्रकार संघ, व विश्वराज हॉस्पिटल
यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान तपासणी विश्वराज हॉस्पिटल लोणी स्टेशन (ता. हवेली) याठिकाणी संपन्न होईल. पत्रकार व त्यांचे कुटूंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर यांनी दिली.

तरी तालुक्यातील सर्व माध्यमातील पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या कुटूंबियासह या तपासण्या करण्यासाठी उपस्थित रहावे.

यामध्ये हिमोग्राम, ब्लड शुगर लेव्हल रॅन्डम , इलेक्ट्रो कार्डीओग्राम , रक्तदाब , वजन, उंची तपासणी याचबरोर ४० वर्षापुढील महिलांची स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सर तपासणी या सह अनेक अत्यंत महत्वाच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तपासणी नंतर तज्ञ डॉक्टर सर्वांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी उपाध्यक्ष – जयदीप जाधव, सचिव – अमोल अडागळे, कोषाध्यक्ष – जितेंद्र आव्हाळे, कार्यकारिणी सदस्य – सचिन सुंबे, चंद्रकांत दुंडे, रियाज शेख व गायत्री भंडारी उपस्थित होते.

1