पुणे सोलापूर महामार्गावर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांचा इशारा

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील पुणे – सोलापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवर व गावात जाणाऱ्या रोडवर रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने थांबवनाऱ्या ४० वाहन चालकांवर १०,१००/- दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सर्व वाहन चालकांना पोलिसप्रशासनतर्फे आवाहन करण्यात येते की,विनाकारण कोणीही आपली दुचाकी, चारचाकी वाहने वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्याचे कडेला वाहने उभी करु नयेत. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उरुळी कांचन पोलीस दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी केले.

Previous articleमराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
Next articleपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून चांडोलीत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित