अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या ग्राम शाखेची अजिवली येथे स्थापना

मावळ-तालुक्यातील अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पहिल्याच ग्राम शाखेची स्थापना अजिवली येथे नुकतीच पुणे जिल्हा अध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर,पुणे जिल्हा व मावळ तालुका कार्यकारीणी आणि पंचक्रोशीतील वारकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थापन करण्यात आली.

संतांचे विचार तळागाळात पोचावे,युवा पिढी सन्मार्गाला लागावी, व्यसनमुक्त समाज घडावा, सर्वांचे आरोग्य सुदृढ रहावे,गोपालन आणि वारकऱ्यांची सेवा करण्याचे तसेच वारकऱ्यांना मुलभुत सुख सोयी मिळवुन देण्यासाठी मंडळ प्रयत्नशिल राहिल असे मत यावेळी बोलताना वक्त्यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमाला नारायण केंडे, संतोष कुंभार, दत्तोबा भोते, भरत वरघडे, दत्तामहाराज शिंदे, गोपिचंद कचरे, तुकाराम भांगरे, गणेश जांभळे, राजाराम असवले,दिनकर निंबळे,सचिन ठाकर, संजय कालेकर,नंदा जाधव,शंकर बोंबले, सोपान येनपुरे,संगिता फाळके,सुमन घरदाळे, शांताराम जगताप, साहेबराव देशमुख दत्तात्रय लायगुडे, भाऊराव कडु आदींसह वारकरी हजर होते.

जाहीर झालेल्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे
शंकर ढोरे – तालुका सल्लागारपदी
मालनताई ढोरे – महिला सलागारपदी

ग्राम समिती –
भगवान शिंदे – अध्यक्ष
दत्ता केंडे – उपाध्यक्ष
गणपत केंडे – कार्याध्यक्ष
सुभाष केंडे – खजिनदार
राजाराम लायगुडे – सचिव
नारायण केंडे – भजन समिती प्रमुख
नवनाथ राऊत – युवा समिती प्रमुख
सुनंदा जाधव – महिला प्रमुख
निवृत्ती जाधव – व्यसनमुक्ती प्रमुख
वसंत बोंद्रे – गोपालन समिती
पांडु उंबरकर – वारकरी से.स. प्रमुख
नथु केदारी – आरोग्य समिती प्रमुख
श्रीपती केंडे – प्रासंगिक कार्य स.प्रमुख
तर गबळु लोहेकर,भाऊ शिंदे,ज्ञानेश्वर लायगुडे, नंतु लायगुडे,बबन लायगुडे, गबळु बोंद्रे,किसन सुतार यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

Previous articleयेळसे येथे काकडा आरती समाप्ती
Next articleसरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आठ डिसेंबर रोजी होणार..