पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो – खासदार डाॅ.अमोल कोल्हे

नारायणगाव -(किरण वाजगे)

पत्रकारांची भुमिका नैतिक व पारदर्शक असावी. त्यांच्या लेखनीची ताकद व सादरीकरणाची किमया ही समाज विकासासाठी वापरली जावी. पत्रकारिता करताना माणूस म्हणून सज्ज असणं गरजेचं आहे. कारण पत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो असे प्रतिपादन खा.डाॅ.अमोल कोल्हे यांनी केले.

अखिल मराठी युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य, जुन्नर तालुका यांनी आयोजित केलेल्या तालुक्यासह महाराष्ट्रातील विविध कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नारायणगाव येथे पार पडला. यावेळी डॉक्टर कोल्हे बोलत होते.

याप्रसंगी जि.प.सदस्या आशाताई बुचके, सरपंच योगेश पाटे, उद्योजक अमित बेनके, डाॅ. मिलिंद कसबे, आशाताई बुचके, उद्योजक संजय वारुळे, बाळासाहेब ढोकले, डाॅ.मिलिंद कसबे, मेहबुब काझी, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अशफाक पटेल, लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन मनोज भळगट, अध्यक्ष मिलिंद झगडे, रोटरीचे माजी अध्यक्ष योगेश भिडे, पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा काजल फुलसुंदर, सचिव ऍड.कुलदीप नलावडे, सहसचिव राहुल घाडगे, कार्याध्यक्ष कृष्णा देशमुख, खजिनदार सचिन भोर, सभासद मयुर बागुल, धनश्री कडाळे यांसह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या पदग्रहण समारंभात राज्य कायदेशीर सल्लागारपदी ऍड.केतन पडवळ, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विशाल पवार, पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष डाॅ.तुषार देशमुख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत हक्कदार, सल्लागार उमेश पवार, आंबेगाव तालुका अध्यक्षपदी निलेश इळवे, जुन्नर तालुका अध्यक्षपदी योगेश रायकर, उपाध्यक्ष धनंजय माताडे, मजहर तिरंदाज, सचिव धनश्री कडाळे, सहसचिव सागर मांडे, कार्याध्यक्ष स्वप्निल ढवळे, सहकार्याध्यक्ष जयचंद्र फुलसुंदर, खजिनदार संतोष हाडवळे, सहखजिनदार किरण पाडेकर, वैद्यकीय सल्लागार डाॅ.महादु वाणी, डाॅ.महेश महाले, उद्योजक सल्लागार अक्षय पासलकर, राहुल गावडे, ज्योती गडगे, संघटक किशोर वारुळे, प्रसिद्धीप्रमुख रुपेश जाधव, सांस्कृतिक सल्लागार गणेश मोढवे, मंगेश फाकटकर, संजय फल्ले, किरण जाधव, संपर्कप्रमुख जितेंद्र आंद्रे, कायदेशीर सल्लागार ऍड.समीर पुरवंत, व्हिडिओग्राफर आदेश घाटपांडे, निलेश औटी, फोटोग्राफर ऋषिकेश हांडे, प्रशांत संभेराव, सदस्य अक्षय परदेशी, साहिल नलावडे, भारती हांडे, सारिका रायकर यांसह विविध पदाधिकारी य‍ांना अखिल मराठी युवा पत्रकार संघाच्या पदाधिकारीपदाचे ऒळखपत्र व नियुक्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतिक सल्लागार गणेश मोढवे यांंनी केले. प्रास्ताविक अशपाक पटेल यांनी केले तर आभार जुन्नर तालुकाध्यक्ष योगेश रायकर यांनी मानले.

Previous articleआळंदीत शहराध्यक्ष अजय तापकीर यांच्या उपस्थितीत मनसेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
Next articleनिघोजे येथे अवैधरित्या चालू असलेल्या हातभट्टीवर महाळुंगे पोलिसांची कारवाई