निघोजे येथे अवैधरित्या चालू असलेल्या हातभट्टीवर महाळुंगे पोलिसांची कारवाई

चाकण- खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या काठी सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर महाळुंगे पोलीस चौकीच्या पथकाने छापा मारला. यामध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भिजवलेले ७००० लिटर रसायन नष्ट केले असून एक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निघोजे गावच्या हद्दीत सुभाषवाडी येथील इंद्रायणी नदीच्या काठावर काही जण गावठी दारू तयार करत असल्याची माहिती महाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टी वर छापा टाकला. त्यामध्ये पोलिसांनी दारू तयार करायचे कच्चे रसायन असा एकूण दोन लाख ऐंशी हजार  रुपयांचा माल नष्ट केला आहे.

पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार राठोड, पोलीस नाईक अमोल बोराटे, पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ, पोलीस नाईक वाजे, पोलीस कॉन्स्टेबल माटे यांनी ही कारवाई केली असून. आरोपी फरार झाला आहे. महाळुंगे पोलीस शोध घेत आहेत.पुढील तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.

Previous articleपत्रकार हा समाजमनाचा आरसा असतो – खासदार डाॅ.अमोल कोल्हे
Next articleकॅरामेलाज केक कंपनी मधील कामगारांना बोनस म्हणून एलईडी टिव्ही संचचे वाटप