दौंड तालुक्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम प्रामाणिक पणे राबवावी- सभापती आशा शितोळे

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुक्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम प्रभावी राबवावा असे मत दौंड पंचायत समितीचे सभापती आशा शितोळे यांनी व्यक्त केले तर सर्वांनी मीच माझा रक्षक म्हणून खबरदारी घ्यावी असे आवाहन उपसभापती नितीन दोरगे यांनी व्यक्त केले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत राज्यातील शहर, गाव, वाड्या-वस्त्या यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी क्रोमा बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तिशः भेटून आरोग्य तपासणी करणे बाबत माननीय मुख्यमंत्री यांनी करोनावर मात करण्यासाठी महत्त्वकांक्षी अशी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम दिनांक 15 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी सदर योजनेअंतर्गत सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी यांना मोहिमेच्या विविध टप्प्यामध्ये सहभागी होण्याबाबत विनंती केली आहे त्यानुसार माननीय खासदार सुप्रियाताई सुळे व मा. आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या सहकार्य मार्गदर्शनानुसार दौंड तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती पं स उपसभापती नितीन दोरगे यांनी दिली.

दौंड तालुक्यातील भांडगाव मध्ये आज मा.सभापती आशाताई शितोळे यांच्या हस्ते माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी मा.गणेश कदम जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य येळे गट विकास अधिकारी , नितीन शितोळे सामाजिक कार्यकर्ते व भांडगाव चे प्रशासक मुलानी विस्तार अधिकारी पंचायत उपस्थित होते.

अध्यक्ष भाषणात सभापती यांनी सर्व आशा वर्कर,शिक्षकव ग्रामपंचायत कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास करोनाची साखळी तुटू शकते तेव्हा सर्वांनी राष्ट्रीय कार्य समजून काम करावे असे आवाहन केले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील पाटस, कुंरकुभ, केडगाव, नानगांव, वरवंड, यवत व राहू या मोठ्या गावात आशा वर्कर शिक्षक आरोग्य कर्मचारी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहभागाने सहकार्याने सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सात गावातील एकूण लोकसंख्येपैकी 74975 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे यात 419 लोकांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आली असता त्यांची सखोल तपासणी केली त्यातील 68 नागरिक करोना पॉझिटिव आढळून आले असल्याचे उपसभापती नितीन दोरगे यांनी सांगीतले. तालुक्यातील उर्वरित सर्व ग्रामपंचायती अंतर्गत गावांमधील नागरिकांची आरोग्य तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

तालुक्यात पाच ठिकाणी शासनाच्या वतीने करोना केअर सेंटर सुरू करण्यात आली आहे तर सहा ठिकाणी DCHC सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती गट विकास अधिकारी अजिक्य येळे यांनी दिली.तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या योजनेचे उद्दिष्ट समजुन सांगितले.
माजी आम.व पुणे जि.म.बॅकेचे अध्यक्ष रमेश आप्पा थोरात यांच्या आवाहनानुसार व विनंतीला मान देऊन तालुक्यातील सात खाजगी दवाखाने तील डॉक्टरांनी करोना बाबत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील लाभ सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तालुक्यात एकूण सात हॉस्पिटलच्या माध्यमातून एकूण 118 OXYGEN BED उपलब्ध करून देण्यात आले आहे.
माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय अधिकारी पासून ते वार्ड बॉय पर्यंत अतिरिक्त कर्मचारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.करोना चा प्रादुर्भाव कमी होणे कामी व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य व्यवस्थित राहणे कामी पंचायत समितीतील सर्व सदस्य व जिल्हा परिषद सदस्य मा. आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र कार्य करत आहेत सर्व प्रतिनिधींचे याकामी लाख-मोलाची मदत होत असल्याचे सभापती व उपसभापती यांनी सांगीतले.
तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत व्यक्तीच्या स्वतःची तपासणी करून घ्यावी व आपले आरोग्य सुरक्षित आनंदायी ठेवावे अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो असे आहवान करून या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपला तालुका आरोग्यमय आनंदी ठेवावा असे उपसभापती नितीन दोरगे यांनी सांगितले.

Previous articleप्रवीण होले यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड
Next articleथकित एफ.आर.पी.ची रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची भाजपा किसान मोर्चाची मागणी