थकित एफ.आर.पी.ची रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची भाजपा किसान मोर्चाची मागणी

सचिन आव्हाड

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे असलेली मागील सर्व थकित एफ.आर.पी.ची रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या गळीत हंगामापुर्वी व्याजासह अदा करणे कामी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी पुणे येथे साखर आयुक्तांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चा चे सरचिटणीस वासुदेव काळे , भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे ,पुणे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष संजय थोरात , पुणे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे , माऊली शेळके , माऊली चवरे ,संजय घुंडरे , केशव कामठे , काकासाहेब खळदकर उपस्थित होते .

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्या घामातुन पिकवलेला ऊस साखर कारखान्यांना देतो आणि एकदा शेतातील माल कारखान्याच्या गव्हाणीत पडला की कारखानदार मालक होतो.काही कारखाने आपवाद वगळता बऱ्याच कारखान्यांना एफ.आर.पी.च्या कायद्याचा विसर पडतो.

ज्या कारखान्यांनी एफ.आर.पी.प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाची किंमत दिलेली नसेल अशा संबंधीत कारखान्यांना आपल्या मार्फत ती शेतकऱ्यांच्या बँक खातेमध्ये येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापुर्वी वर्ग करण्याचे आदेश व्हावेत व सदरची कार्यवाही होणेसाठी आपण कठोर भुमिका घेऊन कायद्याव्दारे या साखर सम्राटांना वठणीवर आणण्याचे काम करावे अशी मागणी करण्यात आली.

अन्यथा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करून साखर आयुक्त कार्यालयाला ” टाळे ठोको’ करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे .

Previous articleदौंड तालुक्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम प्रामाणिक पणे राबवावी- सभापती आशा शितोळे
Next articleबोरमलनाथ मंदिर येथे २५ कोरोना योध्द्यांचा सन्मान