प्रवीण होले यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

अमोल भोसले,दौड

इंटरनॅशनल योंगमुडो फेडरेशन तथा भारतीय योंगमूडो फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट सेमिनार व ब्लॅक बेल्ट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या होत्या,या परीक्षेत 3 डॅन ब्लॅक बेल्ट मिळवणारे मास्टर प्रवीण होले हे भारतीय वेस्ट झोनमध्ये तसेच महाराष्ट्रातील पहिले खेळाडू होण्याचा मान व आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या पाच उत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्यांची निवड झाली आहे,या परीक्षेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय योंगमुडो फेडरेशनचे प्रमुख आंतरराष्ट्रीय परीक्षक,मास्टर हेऑन ताय क्वॉन,(कोरिया)मास्टर: मिन चूल कांग(कोरिया)राष्ट्रीय परिक्षकमास्टर, रोहित नारकर (मुंबई)(संस्थापक अध्यक्ष, भारतीय योंगमुडो महासंघ) मास्टर,राणा अजय सिंग (छत्तीसगड)(महासचिव,भारतीय योंगमुडो महासंघ)मास्टर, प्रविण होले (पुणे)(महासचिव, महाराष्ट्र योंगमुडो असोसिएशन) हे उपस्थित होते.प्रविण होले सर योंगमुडो या खेळाचे विद्यमान महासचिव म्हणून कार्य करत आहेत याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

तसेच भारतीय योंगमुडो फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष, रोहितजी नारकर सर,
महासचिव,राणा अजय सिंग यांनीही सरांचे कौतुक व अभिनंदन केले,प्रवीण होले यांनी ग्रामीण भागातील युवतींना स्वसंरक्षणासाठी तसेच त्यांच्यात निर्भिडता निर्माण व्हावी यासाठी आयोजित स्वयंसिद्धा या शिबिरात प्रशिक्षक म्हणून काम केले आहे त्यांच्या हातून कित्येक खेळाडूंनी यश मिळवले आहे.

तसेच क्रिडा स्तरातुन काही खेळाडू ना प्रशासकीय सेवेत ही नोकरी मिळाली आहे, ते उत्तम परीक्षक व प्रशिक्षक आहेत, सर्वसामान्य तरुणाच्या अंगी असणारे क्रीडा कौशल्य ओळखून ते त्यास प्रशिक्षण देत असतात,सरांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे,,

Previous articleशरद गोरे यांची विधान परिषदेवर वर्णी लावा-ज्ञानेश्वर पतंगे
Next articleदौंड तालुक्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम प्रामाणिक पणे राबवावी- सभापती आशा शितोळे