बकोरीच्या खडकाळ व उजाड डोंगरावर देशी झाडांची लागवड करून जगवनारा अवलीया

दिनेश पवार,दौंड

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील बकोरी च्या उजाड माळरानावर पंचवीस हजार झाडे लावून हिरवीगार सृष्टि निर्माण करण्याचे काम बकोरी येथील वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी केले.

वारघडे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्ताने २२/०३/२०१७ रोजी ठरवले की आपण या ऊजाड डोंगरावर हिरवाई करायची आणि काही निवडक मावळ्यांचे समवेत कामाला सुरवात केली.हे काम चार वर्षांपासून आजतागायत सुरू आहे.सुरवातीला फक्त पाणी आडवण्यासाठी समांतर असे चर घेण्यात आले व नंतर झाडे लावण्यासाठी खड्डे घेण्यात आले .हळु हळु परीसरातील वाॅकिंगला येणारे नागरीकही त्यासाठी मदत करु लागले.

त्यामध्ये केसनंद , वाघोली , कोरेगाव भिमा , सणसवाडी , लोणिकंद पुण्यातील काही संस्था पत्रकार ,डाॅक्टर , वकील ही सर्व मंडळी रोज सकाळी दोन तास मदत करु लागली .जुन २०१७ ला पहीला पाऊस झाला त्यानंतर झाडे लावायचे ठरले परंतु यात ते नविनच असल्याने झाडांची एवढी काही माहिती नसल्याने वारघडे यांनी वनविभागाचे आधिकाऱ्यांना भेटून ग्रामपंचायतीचे पत्र घेऊन पहिल्यावर्षी पाच हजार झाडे लावली. झाडे खुप लहान होती परंतु माहिती नसल्यांने आणि झाडे खड्डा खोदून लावावी लागत असल्यामुळे खूप वेळ लागत असे,डोंगरावर सोमवंशी अकॅडमीची १०० मुले सकाळी व्यायामासाठी साठी येत होती.त्यांची मदत घेऊन रोज सकाळी प्रत्येकाने पाच झाडांची लागवड करत असत यामुळे पाच हजार झाडे लावून कधी झाली समजलेच नाही .झाडे लावल्यानंतर सर्वांना दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानच्या माध्यमातुन नाष्टा दिला जात. यानंतर अनेकांचे वाढदिवस झाडे लावून साजरे करण्यात आले. झाडे लावून झाल्यानंतर जून-जुलै,ऑगस्ट पर्यंत ओलावा चांगला होता परंतु नंतर मात्र पाऊस न झाल्यामुळे व झाडे लहान असल्यामुळे त्यांना पाणी देणे गरजेचे होते . त्या ठिकाणी कोरेगाव भिमा परिसरातील कार्यकर्त्यांनी दोन पाण्याच्या टाक्या दिल्या त्या टाक्या डोंगरावरती मांडल्यानंतर त्या ठिकाणी टँकर जाऊ शकत नव्हता परंतु थोडे – थोडे करून त्या ठिकाणी त्या टाकीमध्ये पाणी भरले .व त्या ठिकाणी टँकर उभा करून घरातील सर्व भांडी हंडा कळशी बादल्या जमा करून सर्व कार्यकर्त्यांनी पहिले दोन महिने त्या ठिकाणी झाडांना हाताने पाणी घातले .नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडे असल्यामुळे सर्व झाडांना पाणी घालणे शक्य होईना,त्याच डोंगराच्या पायथ्याला श्रमदानातून एक छोटासा खड्डा तयार करण्यात आला, त्या खड्डयामध्ये प्लास्टीकचा कागद टाकुन पाणी साठवले व सर्वांनी वर्गणी काढून त्याठिकाणी होंडा कंपनीचे एक लहान इंजिन घेतले आणि पाचशे फुटा पर्यंत पाईप आणून त्या ठिकाणी इंजीनद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली. खऱ्या अर्थाने झाडांना पाणी मिळू लागले आणि झाडांची वाढ होऊ लागली .नंतर कोणीही येत नव्हते वारगडे थांबले नाहीत,रोज सकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत पाणि द्यायचे,अशाप्रकारे २०१८ मध्ये पुन्हा सात हजार झाडे लावण्यात आली.

डोंगराच्या परिसरामध्ये दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठानचे माध्यमातुन एक छोटासा मातीचा बंधारा बांधण्यात आला .नंतर मुले होस्टेलची घरी आल्यानंतर या कामास जरा आधार आला रोज त्या ठिकाणी स्वतः,वारगडे, मुलगा धनराज ,मुलगी धनश्री आणि सर्व कुटुंब त्या ठिकाणी रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत इंजिन घेऊन जाणे व झाडांना पाणी देणे असा उपक्रम नियमीत चालू होता .

पुन्हा २०१९ ला अजून नऊ हजार झाडे लावण्यात आली,हे सर्व काम करत असताना रोज खूप मोठ्या प्रमाणावर पैसे लागत होते,यावेळी स्वतः च्या खिशातून पैसे टाकून हे काम सुरू ठेवले या ठिकाणी काही नागरिक टँकरसाठी साठी पैसे देत होते परंतु बाकी खर्च ते स्वतः करत होते,त्याठिकाणी आजपर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत . अर्धा फुट असलेली झाडे दहा फुटांपर्यंत वाढली असून, ती आनंदाने डोलत आहेत, त्या ठिकाणी अनेक पशुपक्षी या ठिकाणी वास्तव्य करत आहेत .आणि खूप छान असं वातावरण तयार झाले आहे .माती बंधारा पाण्याने तुडुंब भरला आहे.पक्षांचा चिवचिवाट,प्रसन्न वातावरण निर्माण करत आहेत,इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करून एक पर्यटन स्थळ करण्याचा मानस आहे,पाच लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलेले आहे .अनेक संस्थानी मित्रानी मदत केली त्यामध्ये बकोरी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शिरुर हवेली वाॅकींग गृप ,वाय टी डीएस संस्था पुणे,आर्ट ऑफ लिव्हींग,लोणिकंद पोलीस स्टेशन ,सोमवंशी अकॅडमी, वनविभाग ,श्री समर्थ प्रतिष्ठान यांनी मदत केली ग्रामपंचायतीने मदत केली.देशी झाडे ही ‘ऑक्सिजन लंग्ज’ म्हणून तेथे ओळखली जातात. त्या मंडळींच्या प्रयत्नांमधून पर्यावरणप्रेमींना मार्गदर्शक ठरेल असेच काम उभे राहत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या टापूत पंचवीस-तीस हजार झाडांची लागवड झाली आहे व लागवड केलेली सर्व झाडे जिवंत आहेत .

Previous articleबकोरीच्या डोंगरावर वृक्षारोपण,प्रबोधन करून वाढदिवस साजरा
Next articleपोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या अधिपत्याखाली दौंड मध्ये जिल्ह्यातील पहिली मोक्का अंतर्गत कारवाई