बकोरीच्या डोंगरावर वृक्षारोपण,प्रबोधन करून वाढदिवस साजरा

Ad 1

दिनेश पवार,दौंड- माहिती सेवा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ वारघडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बकोरीच्या डोंगरावर वृक्षारोपण केले त्या ठिकाणी ३७ वडाची व पिंपळाची झाडे लावून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने करोना महामारी या आजाराबाबत समज-गैरसमज व काळजी यावर डॉक्टर मोहन वाघ यांचे व्याख्यान त्याठिकाणी आयोजित केले होते. त्या ठिकाणी त्या व्याख्यानाचा लाभ वृक्षरोपणासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतला.


त्याठिकाणी सदर कार्यक्रमासाठी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, गणेश जाधव, चैतन्य पवार ,अजित गरड, बालाजी वाघमोडे, गणेश सातव ,डॉक्टर मोहन वाघ ,धनराज वारघडे माहिती सेवा समितीचे राज्य उपाध्यक्ष नवनाथ वारघडे उपस्थित होते.सर्वांनी वृक्षरोपण करुनच वाढदिवस साजरा करण्याचे आव्हान चंद्रकांत वारघडे यांनी केले