पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या अधिपत्याखाली दौंड मध्ये जिल्ह्यातील पहिली मोक्का अंतर्गत कारवाई

दिनेश पवार,दौंड- पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या अधिपत्याखाली दौंड मध्ये जिल्ह्यामधील पहिली मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे,मार्च महिन्यामध्ये कोरोना महामारी चे संकट दाखल झालेले होते .संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला होता .त्यामुळे सर्व महामार्ग सुनसान झालेले होते. लॉकडाऊन असल्यामुळे महामार्गावरील अत्यावश्यक सेवा सोडले तर सर्व वाहतूक बंद होती .पुणे-मुंबई महानगरातील अनेक लोक महामारी ला घाबरून आपल्या कुटुंबासह मिळेल त्या वाहनाने मोटरसायकलने चोरट्या मार्गाने रात्रीच्या वेळेस लॉकडाउन तोडून पुणे-सोलापुर महामार्गाने गावाकडे जात होते. आणि नेमका या परिस्थितीचा फायदा घेऊन पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पाटस ते भिगवण पर्यंत दरोडेखोरांची टोळी सक्रिय झाली आणि या दरोडेखोरांनी दररोज महामार्गावरुन जाणार्‍या लोकांना मारहाण करून लूटपाट सुरू केली तसेच अत्यावश्यक सेवेचे मालवाहू ट्रक चालकांनाही लुटण्यास सुरू केली .पोलीस दिवसभर कोरोना लॉकडाऊन चा बंदोबस्त करून रात्रीच्या वेळेस महामार्गावर गस्त करत होतो परंतु टोळी हाताला लागत नव्हती . त्यामुळे पोलिस स्टेशन अंतर्गत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता .अशातच या टोळीने एक दिवस सोलापूर कडून पुण्याकडे धान्य घेऊन निघालेल्या ट्रक चालकास जबर मारहाण करून त्याला भोकसून त्याच्याकडील मोबाईल व पाच हजार रुपये नेले व त्याला इतकी मारहाण केली तो ट्रक चालक गतप्राण झाला त्याच वेळेस इतर ट्रकचालकांना सुद्धा त्यांनी जखमी केले .त्यावेळेस तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व दौंड पोलीस यांनी अत्यंत सचोटीने तपास करून गोपनीय माहिती काढून यातील आरोपी निष्पन्न केले व या गुन्ह्यात

 

देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण (दोघे रा. बोरावकेनगर दौंड), अक्षय कोंडक्या चव्हाण, (रा. माळवाडी, लिंगळी, दौंड), नेपश्या पिराजी काळे (राक्षशवाडी, कर्जत) यांनी केली आहे.

सदरचे आरोपी यांच्याकडे खूप सखोल चौकशी केल्यानंतर सदर आरोपी यांनी महामार्गावरील अनेक गुन्ह्यांची कबुली दिली या आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला चोरी करण्यासाठी दरोडे घालण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त करण्यात आली. सदरचे आरोपी हे अत्यंत व्यावसायिक असून त्यांची एक सुनियोजित संघटित टोळी असल्याचे निष्पन्न झाले या सर्व आरोपींना दौंड पोलीस ठाण्यात तर्फे यापूर्वीच तडीपार करण्यात आलेले होते तरीसुद्धा त्यांच्यात सुधारणा झालेली नव्हती त्यांनी याही पूर्वी कर्जत श्रीगोंदा दौंड या भागात अनेक दरोडे घातले निष्पन्न झाले .त्यानंतर सदर आरोपी वर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अन्वये माननीय पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला त्यांनी सदर कायद्याने कारवाई करण्यास मंजुरी दिली त्यानंतर या आरोपींना मोक्का लावण्यात आला सदर आरोपी यांना मोका लावल्यानंतर सदर आरोपी येरवडा कारागृहातून पळून गेलेले होते त्यातील दोन आरोपींना परत दौंड पोलीस ठाणे अटक केलेली आहे अजूनही अक्षय कोंडक्या चव्हाण व नेपशा काळे हा फरारी आहे .

सदरचा गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील व पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा व पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे यांनी केला सदर आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत दोषारोप पाठवण्यात इतपत सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने सदर आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र मंजुरीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयात मुंबई पाठवण्यात आले सदर ठिकाणी अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्रसिंह यांनी या गुन्ह्यांच्या दोषारोप पत्रास पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पाठपुरावा केल्याने तात्काळ मंजुरी देण्यात आली .सदर आरोपी यांना जेव्हापासून या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेली आहे तेव्हापासून दौंड पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरी दरोडा चे सत्र पूर्णपणे थांबलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक यांनी याहीपुढे मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याबाबत आणखी ही कारवाई सुरू आहे सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस नाईक सचिन बोराटे, सहाय्यक पोलीस फौजदार भाकरे, पोलीस शिपाई नारायण वलेकर यांनी सहभाग घेतला

Previous articleबकोरीच्या खडकाळ व उजाड डोंगरावर देशी झाडांची लागवड करून जगवनारा अवलीया
Next articleकास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाचे पुणे येथे धरणे आंदोलन