कोविडच्या नावाखाली सरकार व महानगर पालिका अवाढव्य खर्च करतात मग ह्या सगळ्या सुविधा आहेत तरी कुठे?

अतुल पवळे पुणे

टीव्ही ९मराठीचे पुणे प्रतिनिधी व सामान्यांचा बुलंद आवाज असणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा उपचाराविना दुर्दैवी मृत्यू झाला. आम्ही जनतेच्या समस्या निरपेक्षपणे मांडतो हाच का आमचा गुन्हा? सध्या कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार त्याच बरोबर महानगरपालिका कोविड सेंटर अवाढव्य खर्च करून उभे करतात, किंवा बिल दाखवतात. आता मात्र प्रश्न उपस्थित झालाय की, हा खर्च नक्की होतोय कशासाठी का तो खरच होतोय की नाही का बिलापुरताच मर्यादित आहे. खर्च होतोय परंतु सुविधा उपलब्ध नाही. याचाच शिकार झालाय पत्रकार पांडुरंग रायकर सतत जनतेच्या समस्या पुढे आणून त्या प्रशासनापर्यंत पोहोचून नेहमी न्याय मिळवून देणार्या पत्रकारावर मात्र अन्याय का? त्याची चुक काय? निरपेक्षपणे काम करणे, पारदर्शकपणे काम करणे, ही आहे काय, किंवा भ्रष्टाचारात सामील न होने ही आहे का? याच उत्तर कोण देणार?

पत्रकारांना सुरक्षा मिळावी यासाठी कायदा लागू करावा यासाठी पत्रकार संघटनेकडून सतत मागणी होऊन देखील सरकार दरबारात कोणतीही दखल घेतली जात नाही. हेच पत्रकार तुम्हाला निवडणूकीत जनतेपर्यंत पोहोचवतात. भ्रष्टाचारात सामील होऊन सुद्धा नेत्यांना मात्र विशेष सुविधा का तर सरकारी टेंडर मिळण्यासाठी, कधीपर्यंत हा लाचारीपणा, ज्या दिवशी पत्रकार नसेल त्या दिवशी जनतेवर दिवसा अन्याय होणार ते आहे म्हणून तर काहीजण घाबरून जगतात. ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो ह्या पूर्ण जबाबदार आरोग्य यंत्रणा आहे याच उत्तर पालकमंत्री व महापौरांनी द्यावे. साधी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही ही शोकांतिका आहे पुणे शहराची व खंत देखील आहे. तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पत्रकार बांधव नक्की लढा देऊ हीच आपणांस श्रद्धांजलि.

Previous articleसंविधानाचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेते प्रवीण तरडे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Next articleसुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेला लावलेल्या कॕश बॕरीयरचे नुकसान