संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेते प्रवीण तरडे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रमोद दांगट , निरगुडसर, प्रतिनिधी

चित्रपट अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर भारतीय संविधानाचा अवमान केल्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबेगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) यांनी केली असून या बाबतचे निवेदन त्यांनी आंबेगाव तहसीलदार यांना दिले आहे.

प्रवीण तरडे यांनी दिनांक २२ रोजी श्री.गणपती देवाची प्रतिष्ठापना करताना देवाच्या मूर्ती खाली भारताचे संविधान ठेवून देवाची प्रतिष्ठापना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरडे यांनी भारतीय संविधानाचा जाणून बुजून अवमान केला असून सर्व भारतीय नागरिकांच्या अस्मितेचा अनादर केला असून त्यांच्यावर भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आंबेगाव तालुका यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी ,पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.

Previous articleवखारीत युरिया टाकण्याने कांद्याचे नुकसान
Next articleकोविडच्या नावाखाली सरकार व महानगर पालिका अवाढव्य खर्च करतात मग ह्या सगळ्या सुविधा आहेत तरी कुठे?