सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेला लावलेल्या कॕश बॕरीयरचे नुकसान

शिक्रापुर,पुणे

पुणे-नगर महामार्गलगत रांजणगाव गणपती येथील एका कॉर्नरवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेला लावलेल्या अल्युमिनीअमच्या डब्ल्यू आकाराच्या कॕश बॕरीयरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत मोडतोड केल्याची पाहायला मिळत आहे .त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग काय कारवाई करतय हे पाहणे म्हत्तवाचे ठरणार आहे. मागील आठवड्यात पुणेनगर महामार्गावर शिक्रापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ताच्या कडेला लावलेले अल्युमिनीअमचे डब्ल्यू आकाराचे कॕश बॕरीयर चोरी गेल्या प्रकरणी तत्परता दाखवत शिक्रापुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

परंतु आता रांजणगाव गणपती जवळ एका खाजगी कंपनीने खोदकाम करताना रस्त्याच्या कडेला लावलेले अल्युमिनीअमचे डब्ल्यू आकाराचे कॕश बॕरीयरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.तर ते पूर्णपणे उखडून टाकून मोडतोड देखील करण्यात आली त्यामुळे शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळतात.तर या कार्नरला आपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे.त्यामुळे ज्या पद्धतीने शिक्रापूर येथील कॕश बॕरीयर
चोरी गेले बाबतची तक्रार दाखल करण्यास तत्परता दाखवली त्याचप्रमाणे आता रांजणगाव येथील शासकीय मालमत्तेच्या नुकसानीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग तक्रार दाखल करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले याबाबत आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दंड वसूल करणार आहोत,

परंतु वाहनचालकांच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावलेल्या
कॕश बॕरीयरचे नुकसान केलेल्या व्यक्तीवर फक्त दंडात्मक कारवाई करून चालणार का ? जर येथे आपघात घडून एखादी दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण ? हादेखील प्रश्‍न नागरिकांना पडला आहे .

Previous articleकोविडच्या नावाखाली सरकार व महानगर पालिका अवाढव्य खर्च करतात मग ह्या सगळ्या सुविधा आहेत तरी कुठे?
Next articleअखेरीस शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी रस्ता खोदणाऱ्यावर गुन्हा दाखल