भव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

योगेश राऊत , पाटस

साई मल्हार कराटे डो-असोसिएशन ऑफ इंडिया आणि साई मल्हार इंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव चौफुला या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी पुणेसह लातूर, परभणी, अहमदनगर ,सातारा, रायगड ,सांगली, कोल्हापूर सोलापूर या ठिकाणचे एकूण 375 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अशी माहिती स्पर्धा आयोजक प्रा. कैलास महानोर यांनी दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी हाळनोर साहेब उद्घाटक आनंद दादा थोरात यांनी केले. स्वागताध्यक्ष तानाजी तात्या केकान यांनी भूषविले.

या कार्यक्रमांमध्ये आदर्श कराटे प्रशिक्षक पुरस्कार चंद्रकांत राहीज- अहमदनगर, तुषार अवस्त्री- लातूर, सुनील खताळ- सातारा ,सागर आदमाने – संतोष सोनवणे- पुणे, जयश्री पांडकर- बीड, कविता दवणे- सांगली,व तसेच कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक कार्यात काम करणाऱ्या मान्यवरांचा समाज भूषण पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन आनंदा थोरात यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार वितरण करण्यात आले. मानकरी सचिन शिंदे ,सुनील नेटके, डॉ. नवनाथ अडसूळ, संजयजी हाळनोर, स्वप्निल भागवत, उज्वलाताई गोंड, तानाजी केकान यांना देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सचिन भांडवलकर, संतोष वरघडे,अर्चना पाटील, डॉ.नवनाथ अडसूळ, उपस्थित होते.यावेळी स्वप्नील भागवत सदस्य ग्रामपंचायत पाटस यांनी कराटे खेळाडूंना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम अक्षय धनवटे , हेमंत महानोर, प्रिया राऊत, नक्षत्रा महानोर,तेजश्री गवते, राजेश्वरी ढेबे यांनी घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास महानोर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सचिन राऊत यांनी मानले

Previous articleदौंड शहरात वारंवार जाणारी लाईट व निकृष्ट कामाची चौकशी व्हावी: दौंड शहर काँग्रेस कमिटी
Next articleक्रांतीताई गाढवे यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम