यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा:-पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक

दिनेश पवार दौंड प्रतिनिधी

कोरोना च्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव साध्यापणाने साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सर्व गणेश मंडळांना केले आहे.

कोरोना संकट सध्या मध्यावर वाटचाल करत आहे. गेले पाच महिने आपण सर्वांनी कोरोना संकट थोपवून धरलेले आहे. नियमात राहूनच जयंत्या सण उत्सव साजरे केले आहेत. या संकटाशी सामना करत असताना आमच्या काही आप्तेष्टांनी या जगाचा अकाली निरोप घेतलेला आहेत .या संकटातून बाहेर येण्यासाठी आमचे शासन प्रशासन शास्त्रज्ञ समाजसेवी संघटना डॉक्टर्स अहोरात्र कष्ट करत आहेत .या संकटाचा प्रत्येकाला आर्थिक फटका बसलेला आहे. या लढाईत प्रत्येक जण योद्धा आहे. आणि लढाई म्हटली की प्रत्येकाला त्याग हा करावाच लागतो. म्हणून गणेशोत्सव काळात असणारा उत्साह मनामध्ये वाढवून दिखाऊपणा कमी करायचा आहे.

महाराष्ट्राचे भूषण म्हणजे गणेशोत्सव आगामी काही दिवसातच त्याची सुरुवात होत आहे .यावर्षी गणेश उत्सवाचे स्वरूप हे साधेच असणार आहे .यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये कोणतीही आगमन व विसर्जन मिरवणूक असणार नाही.चार फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती असणार नाही.शक्यतो गणपती मंदिरात बसवावेत. खेडेगावांमध्ये एक गाव एक गणपती ही योजना राबवावी.

लालबागच्या राजाच्या गणपतीच्या धरतीवर प्रत्येक दिवशी पाच वेगवेगळ्या लोकांना आरतीचा मान द्यावा नंतर ते फोटो आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकावेत.

गणेश उत्सव काळामध्ये सार्वजनिक अन्नदान शक्यतो टाळावे त्याबदल्यात गोरगरीब लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करावे मास्क शॅनीटायझर लिक्विड सोप चे वाटप करावे.

सगळ्यांनी दररोज आरतीला उपस्थित राहू नये कोणीही मोठ्या प्रमाणामध्ये साऊंड सिस्टिम लावणार नाही.
सर्वांनी सामाजिक अंतर ठेवावे व मास्क वापरावे .गणपती बसवण्याची जागा दररोज सॅनिटायज करावी.

गणपती समोर हॅन्ड शॅनीटायझर ठेवावे व प्रत्येकाने त्याचा वापर करावा. सध्या करूणा संकट आहे या संकटात दुसरे कुठलेही संकट येऊ नये म्हणून परवानगी घेऊन लाईट घ्यावी. सुरक्षित लाईट ची साधने वापरावी.

मेणबत्ती समई व दिवा हे कापडापासून लांब ठेवावे. सध्या पावसाचा सीझन सुरू आहे त्यामुळे लाइट चे कनेक्शन घेताना योग्य अर्थिंग जोडावी. प्रत्येक माणसामध्ये गणपती चा वास आहे आपण सर्वांनी नियम पाळून एकमेकांचा विघ्नहर्ता व्हायचे आहे .
गणपती नेहमी प्रयत्न करणार्‍यांच्या पाठीशीच राहतो. कोरोना संकटाला हरवायचे असल्यामुळे कोणी वरील नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करेल त्याला कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही.अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी दिली.

Previous articleदौंड पोलीस स्टेशनला ISO A+ग्रेड मानांकन
Next articleआंबेठाणचे तलाठी हाजिर हो.!! गावकऱ्यांची आर्त हाक