दौंड पोलीस स्टेशनला ISO A+ग्रेड मानांकन

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड पोलीस स्टेशनला ISO A+ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे,राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी हे मानांकन स्वीकारले,यावेळी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीत झालेला बदल,गुन्हे अभिलेख, गुन्ह्यात झालेली लक्षणीय घट,अंतर्गत प्रशासकीय बाबीमध्ये केलेली सुधारणा,या सर्व बाबींचा विचार करून सदर मानांकन दिले जाते,स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर पार पडलेल्या कार्यक्रमात हे मानांकन देण्यात आले.दौंड पोलीसांच्या कार्यतप्तरतेमुळे दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास तत्काळ करणे,हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सध्या कोरोना परिस्थितीमधील पोलिसांची कामगिरी यामुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरी वरती समाधान व्यक्त केले जात आहे, या मानांकनासाठी परिश्रम घेणारे पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी,कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी वर्गाचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

Previous articleमहाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल त़ंत्रज्ञानावर आधारीत असलेल्या शैक्षणिक मासिकाच्या अंकाचे प्रकाशन
Next articleयावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा:-पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक