आंबेठाणचे तलाठी हाजिर हो.!! गावकऱ्यांची आर्त हाक

Ad 1

चाकण:आंबेठाण तलाठी हाजिर हो अशीच काहीशी परिस्थिती आहे .सातबारावर नाव लावण्यासाठी अनेक प्लॉट धारक शेतकरी एक वर्षापासून आंबेठाण तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवतायेत खेड तालुक्यातील आंबेठाण व इतर दोन गावांच्या सज्जाचे तलाठी शेख यांच्या मनमानी कारभाराला जनता त्रस्त झाली होती. प्लॉट धारक, शेतकरी, आदिवासी बांधव तब्बल एक वर्षापासून सातबारावर नाव लावण्यासाठी  कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. अनेक अवैध धंदे ,चुकीच्या नोंदी, सात बारात अनेक त्रुटी, अवैद्य मुरुम उखन्नन , तलाठी आंबेठाण यांच्या काळात राजेरोस सुरु होते म्हणून त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी तीनही गावातील ग्रामस्थाकडून होत होती.

आंबेठाण सज्याचे तलाठी शेख भाऊसो यांची बदली दुसऱ्या गावी झाली आहे, सदरील बदलीमुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहे पण अनेक धन दांडग्या व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते लोकांना हाताशी धरून अनेक लोकांच्या न सांगता बोगस सह्या व निवेदने देऊन स्वतः ची बदली रद्द करण्याची मागणी सदरील तलाठी करत आहे.

जनतेची कामे करण्याचा प्रचंड कंटाळा आंबेठांण महसूल यंत्रणेला आला आहे. दफ्तर दिरंगाई करून जनसामान्यांना झुलवत ठेवण्याची सवयच तलाठी यांना लागली आहे. तालुक्यातील रोहकल येथील अदिवासी जमीन बेकायदेशीर ताब्याचा कंपनीचा प्रयत्न, त्यास
महसुल विभागाची (तलाठी) छुपी मदत होती आदिवासी लोकांला अंधारात ठेऊन त्यांनी अदिवासी लोकांवर अन्यायच केला आहे

जनतेच्या पैशातूनच आपले वेतन होते याची जाण ठेऊन लोकांच्या कामासाठी तत्परताच दाखवत नसल्याने आंबेठाणचे तलाठी शेख यांची बदली रद्द करू नये अशी आर्त हाक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.