गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे आवाहन

अमोल भोसले, उरुळी कांचन — प्रतिनिधी

महाभयंकर कोरोना आजाराशी लढण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरे करुन विधायक उपक्रमांना हातभार लावावा. आरती व गणेशमूर्तींचे विसर्जन घरगुती पद्धतीने करा. घरात दोन फूट व गणेशोत्सव मंडळांनी चार फूट उंचीपेक्षा अधिक उंचीचे गणपती बसू नयेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील यांची नोंद सर्वानी घ्यावी. तसेच कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस यंत्रणा करत असते. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस यंत्रणेला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केले.

लोणी काळभोर पोलीस ठाणे अंकीत उरुळी कांचन (ता.हवेली) परिसरातील गणेशोत्सव निमित्ताने गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते, पोलीस पाटील, गणेश मूर्ती बनविणारे कारखान्याचे प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उरुळी कांचन पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, कर्मचारी सचिन पवार, सोमनाथ चितारे, संदीप पवार, अमोल भोसले, रुपेश भगत, बापुसाहेब लाड, वर्षा कड, मोहन कुंजीर तसेच मंडळाचे अध्यक्ष व गणेश मूर्ती कारखान्याचे मालक आदी उपस्थित होते.

गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः हाला स्वयम शिस्त लावून घेतली पाहिजे व काही बंधने घातली पाहिजे कोविड – १९ मुळे उध्दवलेल्या संजर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, गणरायाच्या आगमन व विसर्जन मिरवणूकांवर शासनाकडून बंदी घालण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बंडगर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

Previous articleआंबेठाणचे तलाठी हाजिर हो.!! गावकऱ्यांची आर्त हाक
Next articleस्वजिल्ह्यात बदलीने येण्यासाठी शिक्षकांना संधी निर्माण करु-आमदार दिलीप मोहिते पाटील