बचत गटाच्या महिलांनी संघटनातून स्वतःच्या आरोग्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे -माजी सभापती उषाताई कानडे

घोडेगाव

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी योगा प्रशिक्षणाचे आयोजन कळंब येथील महिला बचत गटांनी केले होते. महिला कुटुंबातील आर्थिक प्रश्न सोडवून सक्षम होत आहेत.परंतु स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महिलांनी बचत गटाच्या संघटनातून स्वतःच्या आरोग्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन पंचायत समिती आंबेगावच्या माजी सभापती उषाताई कानडे यांनी केले. महिलांनी आरोग्य विषयक जाणीवजागृती साठी शिवार फेरीचे आयोजन केले होते.

यावेळी महिलांना जाणवणाऱ्या आजार व व्यायाम या विषयावर आर्ट ऑफ लिव्हिंग च्या प्रशिक्षक संगीता ढमाले व सुवर्णा मुळे यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले.यशवर्धिनी संघाच्या मार्गदर्शनाने कळंब भागात 500 महिलांचे संघटन करून बचत गटांचे कार्य सुरू आहे.

संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप यांनी महिलांना बचत गट ते महिला उद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी सविता मुंढे, मदिना पटेल,मीना गव्हाणे, ललिता वरपे,शांता थोरात, रुपाली कानडे,सानिया शेख या उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्पना एरंडे, सुहास वाघ, सीमा कानडे, हरिभाऊ गेंगजे,सारिका भालेराव यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन रंजना आंग्रे यांनी तर आभार सविता चिखले यांनी मानले.

Previous articleस्व.माणिकराव देशमुख यांच्या स्मरणार्थ कृषी,सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतील व्यक्तीस पुरस्काराने सन्मानित करणार – एस एम देशमुख यांची घोषणा
Next articleपीएमपीएलची बस सेवा घोडेगाव पर्यंत सुरू ; कुंदन काळे यांच्या प्रयत्नांना यश