स्व.माणिकराव देशमुख यांच्या स्मरणार्थ कृषी,सामाजिक कार्य आणि पत्रकारितेतील व्यक्तीस पुरस्काराने सन्मानित करणार – एस एम देशमुख यांची घोषणा

उरुळी कांचन

वडवणी तालुक्यातील देवडी येथील माजी सरपंच स्व. माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बीड जिल्ह्यातील एक पत्रकार एक समाजिक कार्यकर्ता आणि एका प्रगतीशील शेतकरयास पत्र भूषण, समाज भूषण आणि कृषी भूषण पुरस्कार देऊन “माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या” वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा ज्येष्ठ पत्रकार तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी केली.

देवडी गावचे भाग्यविधाते, माजी सरपंच माणिकराव देशमुख याचं नुकतंच निधन झालं. माणिकराव देशमुख हे स्वतः शेतकरी होते. शेतीत नवे प्रयोग करणारया तरूण शेतकर्यांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले होते.गावातील काही प्रगतीशील शेतकरयांचा त्यांनी सत्कारही केला होता. स्वतः सामाजिक कार्यकर्ते असलेल्या माणिकराव देशमुख यांनी देवडी गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले.

सकाळच्या माध्यमातून बंधारा बांधून गावातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर केली, गरीब आणि गरजू मुलांना सायकलचे वाटप करून त्यांची पायपीट थांबविली, जिल्हा परिषदेत शाळेत इ-लर्निंगची व्यवस्था करून गावातील मुलांसाठी आधुनिक शिक्षणाचे दरवाजे खुले केले. स्वतःच्या शेतात चारशेवर झाडं लावून वृक्षारोपणाचा संदेश दिला. कृषी आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम अजोड असलयाने त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत राहावी यासाठी कृषी, सामाजिक क्षेत्रातील आणि पत्रकारितेतील एका मानयवरास दरवर्षी २००१ रूपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देउन सन्मानित करण्यात येणार आहे. दरवर्षी २६ फेब्रुवारी रोजी देवडी येथील “माणिक बागेत” मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा होईल अशी माहिती ही एस. एम. देशमुख यांनी दिले.

Previous articleमल्लखांबचे राष्ट्रीय खेळाडू प्रा.डॉ. भिमराव केंगले यांना सन २०२१ चा युवा व क्रीडा मंत्रालयाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
Next articleबचत गटाच्या महिलांनी संघटनातून स्वतःच्या आरोग्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे -माजी सभापती उषाताई कानडे