दौंडमध्ये इंडीपेंडट इंग्लिश स्कुल असोसिएशनची स्थापना

दिनेश पवार,दौंड

 तालुक्यातील इंग्लिश मध्याच्या शाळेंच्या अडचणी सोडवण्यासाठी दौंड तालुका इंडिपेंडट इंग्लिश स्कुल असोसिएशनची स्थापना करण्यात आली,या असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी सिटी इंटरनॅशनल स्कुल चे चांगदेव शेलार,सचिवपदी लर्न अँड प्ले स्कुल च्या सविता मनोहर भोर,सहसचिवपदी ज्ञानसिंधु इंग्लिश स्कुल च्या वैशाली गणेश जगदाळे, खजिनदारपदी संस्कार इंग्लिश स्कुल चे जयंत अंबादास पवार यांची कार्यकारी मंडळावरती नियुक्ती करण्यात आली,सदर नियुक्ती चे पत्र पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांच्या हस्ते देण्यात आले.

या असोसिएशनच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होणार असून,विद्यार्थ्यांना देखील व्यक्तिमत्त्व विकास,क्रीडा,सामाजिक इत्यादी क्षेत्रातील नवनवीन योजना उपक्रम एकात्मिक भावनेने राबविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कलात्मक, गुणात्मक दृष्टीने विकास करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्न करू असे असोसिएशनचे खजिनदार जयंत पवार यांनी सांगितले,आमच्या प्रतिनिधी शी बोलताना पवार म्हणाले की,संस्कार स्कुल च्या वतीने नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून शहरातील निर्माल्य संकलन मोहीम राबवणे,पर्यावरण पूरक उत्सव आयोजित करणे,कोरोना योद्धा सन्मान सोहळा आयोजित करणे असे उपक्रम राबविले होते याला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, असेच उपक्रम यापुढे संपूर्ण तालुक्यात असोसिएशनच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत

Previous articleनारायणगाव मध्ये लाला अर्बन बँकेच्या बाजारपेठेतील शाखेच्या नूतन स्वमालकीच्या वास्तूचे उद्घाटन
Next articleदौंड तालुका कला,वाणिज्य महाविद्यालय सुरू