दौंड तालुका कला,वाणिज्य महाविद्यालय सुरू

दिनेश पवार,दौंड

तालुक्यातील दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत सुरू करण्यात आले आहे, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या उत्साहाने महाविद्यालय परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्राचार्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना सॅनिटायजर,मास्क,सोशल डिस्टन या गोष्टींचे पालन करत महाविद्यालयात पहिला दिवस सुरू झाला.कोरोना च्या प्रादुर्भावाचा विचार करता ऑनलाइन लेक्चर सुरू होते परंतु आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता आल्याने विद्यार्थी, प्राध्यापक आनंदी होते,आपले मित्र भेटल्याने विद्यार्थी आनंदी होते.

यावेळी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते, दौंड महाविद्यालयात इयत्ता 11 वी 12 वी कला,वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय तर प्रथम वर्ष कला,वाणिज्य ते पदव्युत्तर पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे, महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण,गुणवत्तापूर्ण शिक्षण व अनुभवी प्राध्यापक या वैशिट्यामुळे महाविद्यालयाचे नावलौकीक आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत ढेकणे,विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख सुनील वाघ,परीक्षा विभाग प्रमुख डॉ.पांडुरंग बिडकर,प्रा.दिलीप पवार,प्रा.दिनेश पवार व इतर प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleदौंडमध्ये इंडीपेंडट इंग्लिश स्कुल असोसिएशनची स्थापना
Next articleमहात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर रोजी खानवडीत होणार – दशरथ यादव