शववाहिनीची खरेदी करण्यासाठी मनसेचे आळंदी नगरपरिषदेला निवेदन

आळंदी – शहराची वाढती लोकसंख्या व मृत्यू दर लक्षात घेता शववाहिनीची आळंदी शहराला आवश्यकता असल्याने तसेच आळंदी शहराचा व परिसराचा विस्तार खूप मोठा आहे. नागरिकांना एखादा नागरिक मृत्यू झाल्यास स्मशानभूमी पर्यंत पायी चालत यावे लागत आहे. हे अंतर खूप लांब पडत असण्याने आळंदी वासीयांना त्रास होत आहे. शववाहिनीची खरेदी करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेला मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले

 नगरपरिषदने बजेटमध्ये शववाहिनीसाठी  तरतूद केली परंतु आज पर्यंत शववहिनीची खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली नाही.त्यामूळे नगरसेवक , अध्यक्ष यांनी ठराव मंजूर करून तत्काळ निविदा प्रक्रिया राबविण्यात अशी मागणी मनसेचे आंळदी शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी केली आहे

Previous articleकनेरसर मध्ये क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleसंघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोविड योद्धांचा सन्मान