कनेरसर मध्ये क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

राजगुरूनगर- अंबिका विद्यालय कनेरसर येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम मान्यवर मंडळींच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली, त्याचप्रमाणे मान्यवर मंडळींनीही आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी कनेरसर गावचे सरपंच सौ.सुनिताताई केदारी, शालेय समिती अध्यक्ष सागरभाऊ म्हसुडगे, मा.सरपंच हनुमंतराव दौंडकर, ग्रा.सदस्य प्रशांत म्हसुडगे, ग्रा.सदस्य उमेश दौंडकर,मा.पो.पा.मोहनशेठ दौंडकर,तं.समिती अध्यक्ष तान्हाजी दौंडकर, सा.का.अतुल कानडे,युवा नेते सनी दौंडकर,कचरु सोनवणे, बालाजी शिंदे, किशोर म्हसुडगे, अक्षय दौंडकर, सुमित हजारे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य वाघमारे सर यांनी केले, तसेच सुत्रसंचालन रसाळ मॅडम यांनी केले तर आभार भालारे सर यांनी केले.

Previous articleपोलीस पाटील सचिन पोळ यांची उपाध्यक्षपदी निवड
Next articleशववाहिनीची खरेदी करण्यासाठी मनसेचे आळंदी नगरपरिषदेला निवेदन