पोलीस पाटील सचिन पोळ यांची उपाध्यक्षपदी निवड

दिनेश पवार,दौंड- महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलीस पाटील संघाच्या उपाध्यक्षपदी देऊळगाव राजेचे पोलीस पाटील सचिन ईश्वर पोळ यांची निवड करण्यात आली, संघटनेशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे योग्य कार्य केल्याबद्दल पोळ यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,सचिव विठ्ठल महादेव बारवकर,पुणे जिल्हा अध्यक्ष साहेबराव मुरलीधर राळे यांच्या उपस्थित ही निवड करण्यात आली.

सचिन पोळ यांनी देऊळगाव राजे मध्ये कायदा व सुव्यवस्था,शांतता अबाधित राहण्यासाठी पोलिसांना महत्वपूर्ण मदत केली आहे तसेच गावात कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून ग्रामस्थांनी योग्य खबरदारी घ्यावी असे वेळोवेळी सांगून जनजागृती केली आहे. ग्रामसुरक्षा दल च्या संपर्क नंबर वरून देखील त्यांनी तत्काळ माहिती ग्रामस्थांपर्यँत पोहचवण्याचे काम ते करत आहेत या सर्व कामगिरी ची दखल घेऊन पोलीस पाटील संघ च्या वतीने पोळ यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल परिसरातून पोळ यांना विविध माध्यमातून शुभेच्छा देण्यात येत आहेत

Previous articleचंद्रकांत वारघडे यांचा वृक्षमित्र पुरस्काराने गौरव
Next articleकनेरसर मध्ये क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती उत्साहात साजरी