संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोविड योद्धांचा सन्मान

राजगुरूनगर- स्वतंत्र भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संघर्ष युवा प्रतिष्ठान, खेड तालुका यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत खेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी अशा ग्रामीण भागातील दुर्लक्षित परंतु कोविड महामारी काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणार्‍या जनसेवकांचा सन्मान करण्यात आला.


तालुक्याच्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे कामकाज पाहणार्‍या प्रमुख अधिकारी वर्गाचा सन्मान राजगुरूनगर, खेड येथील संबंधित प्रशासकीय कार्यालयांना भेट देवून करण्यात आला.


यावेळी खेडचे प्रांताधिकारी श्विक्रांत चव्हाण , तहसिलदार वैशालीताई घोडेकर, नायब तहसिलदार मदन जोगदंड साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाटे , पोलिस निरीक्षक सतीश गुरव , तालुका आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. सर्व मान्यवर प्रशासकीय अधिकारी यांनी कोविड काळात तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे नियोजनबद्ध आखणी करून केलेल्या विशेष कामासाठी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक , गुलाबपुष्प देवून गौरव करण्यात आला.

प्रतिष्ठानचे मार्गदर्शक शिवसेना माजी जिल्हाप्रमुख डॉ. रामशेठ गावडे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली.

या कार्यक्रमाला संघर्ष युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल वीरकर, अ‍ॅड. गणेश सांडभोर, अ‍ॅड.वैभव कर्वे, प्रदीपकाका कुलकर्णी, माजी सरपंच सुनील धंद्रे, चंद्रकांत भोर, गोरक्ष सुकाळे, बाजीराव बुचडे, महेंद्र घोलप, तुषार सांडभोर, नवनाथ कोतवाल, अक्षय कौदरे, संकेत खुटवड,मनोहर गोरगल्ले, प्रसाद दिंडाळ, नामदेव जोगदंड आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleशववाहिनीची खरेदी करण्यासाठी मनसेचे आळंदी नगरपरिषदेला निवेदन
Next articleशिक्षक दिनाच्या निमित्ताने माजी आदर्श पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे यांना गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने सन्मानित