शिक्षक दिनाच्या निमित्ताने माजी आदर्श पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे यांना गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने सन्मानित

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शिक्षक सेलचे सरचिटणीस बाळकृष्ण काकडे यांनी व्यक्त केले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने श्री गुरुदत्त सेवा मंडळ उरुळी कांचन (ता.हवेली) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी सर्वोदय संघाचे – महात्मा गांधी विद्यालयाचे माजी आदर्श पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी पोलीस मित्र संघटनेचे सुरेश वाळेकर, श्रीगुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनिल तुपे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब तुपे, वकील आदेश तुपे आदी उपस्थित होते.

Previous articleसंघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोविड योद्धांचा सन्मान
Next articleया वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा – सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते