Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायणगाव (किरण वाजगे)
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी चार आरोपींना आळेफाटा पोलिसांनी आज अटक केली आहे. अशी माहिती आळेफाटा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.
पिडीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच मित्रांनी सतत दोन वर्ष सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात घडली आहे.
पिडीत मुलीने गुरुवारी (१ जुलै रोजी) रात्री याबाबत फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून घेऊन तिचे अश्लिल फोटो काढत इतरांना पाठवण्याची धमकी देऊन पाच मित्रांनी गेल्या काही महिन्यापासून सामूहिक बलात्कार केला. तसेच संबंधीत मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेतील आरोपी पाच मित्रांनी पिडीत मुलीला आळेफाटा येथील नगर रोडवरील एका लॉजवर १५ जून २०१९ ते १५ जून २०२१ च्या दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून संजय पोटे (वय २८), निखील पोटे (वय २२), दयानंद टेमगिरे (वय २०) सुरज उदय तितर (वय २३), यश गाडेकर (हे सर्व राहणार आळेफाटा) यांना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींच्या विरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार आरोपींसह एक आलिशान वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच एका आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर पवार करीत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.