नारायणगावात पुन्हा एकदा नेपाळी सुरक्षा रक्षकाकडून घरफोडी : ३० तोळे सोन्याचांदीच्या दागिन्यांबरोबर रोख रक्कम लंपास

नारायणगाव (किरण वाजगे)

हिवरे तर्फे नारायणगाव (तालुका जुन्नर) येथे राहणारे ज्येष्ठ उद्योजक सुदाम अण्णा दळवी यांच्या घरात आज सुरक्षारक्षकाने घरफोडी केली आहे.
विक्रम साहा उर्फ बिक्रम शाँ हा नेपाळी वॉचमन सुदामशेठ दळवी आण्णा यांचे बंगल्यावरकाही महिन्यांपासून वॉचमन म्हणून काम करीत होता. त्याने दळवी आण्णा यांचे घरी आज सकाळी दहा ते दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान चोरी करुन पोबारा केला आहे.

या लफंग्या ने सुमारे तीस तोळे सोने चांदीचे दागिने व दीड लाख रुपये चोरून नेले असल्याचे सुदाम अण्णा दळवी यांनी सांगितले आहे.

दरम्यान या चोरट्याला चा चे छायाचित्र साळे पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सोशल मीडियाद्वारे प्रसारित केले असून जर कोणाला छायाचित्रातील आरोपी दृष्टिपथात पडला तर तात्काळ नारायणगाव पोलीस स्टेशनशी (०२१३२ २४२०३३) संपर्क साधावा असे आवाहन ताटे यांनी केले आहे.

यापूर्वी १५ मार्च २०२१ रोजी नारायणगाव येथील ज्येष्ठ डॉक्टर एस जी गोसावी यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून अशाघप्रकारे चोरी झाली होती. वारंवार अशाप्रकारे नेपाळी सुरक्षारक्षकाद्वारे सातत्याने घरफोड्या होत असल्याने सर्वांनी अशा नेपाळी वॉचमनला कामावर ठेवावे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यापुढे जागरूक नागरिकांनी सुरक्षारक्षक असलेले कोणीही नेपाळी अथवा इतर परराज्यातील तसेच अनोळखी कोणीही व्यक्ती असेल तर त्याचे संपूर्ण ओळख पत्र आधार कार्ड या गोष्टी तसेच नेपाळ देशाचे ओळखपत्र असावे याशिवाय अशा भूरट्यांना व चोरट्यांना आपण सुरक्षारक्षक म्हणून कामावर ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान सातत्याने सुरक्षा रक्षकांकडून होणाऱ्या चोऱ्यांचा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव खैरे यांनी निषेध केला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या नेपाळी चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी खैरे यांनी केली आहे.

Previous article१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
Next articleसंस्थाचालक शिक्षण मंडळाकडून शिक्षण आयुक्तांना मागण्यांचे निवेदन