मावळ तालुक्यात भात पेरणीची लगबग सुरू

मावळ- तालुक्यातील पवनमावळ, नाणेमावळ, आदरमावळ परिसरात भात पिक मोठ्या प्रमाणावर घेत असुन काही दिवसाच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या पावसाचा आंदाज घेऊन व दोन दिवसापुर्वी मान्सून पुर्व पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना भात पेरणी साठी शेतीची मशागत करून भात रोपाची पेरणी करण्याची लगबग मावळ सह परिसरात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी, आंबे मोहोर, कोळब,अशा भात पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असतात.हवामान खात्याच्या अंदाजानुसार ह्या वर्षी पाऊस समाधान कारक असल्याने शेतकऱ्यांच्या आंनदात मोठ्या प्रमाणावर भर पडली असल्याचे चित्र शेतकऱ्यांन मध्ये दिसत आहे.

तर पवनाधरणाच्या पाण्यावर पवनमावळ परिसरातील येळसे,वारु,काले,कोथुर्णे, शिवली,ब्राम्हणोली, शिवणे,करुंज, अशा गावामध्ये पाण्याची सुविधा असल्याने ह्या परिसरात बागायती क्षेत्र असल्याने ह्या भागात मोठ्या प्रमाणावर भात पेरणी सुरु आहे.तर पवनमावळ परिसरातील पश्चिम भागातील तुंग, मोरवे,चावसर,धालेवाडी, येलघोल, धनग्हाण, शिंळीब, अशा भागामध्ये दोन दिवसापुर्वी झालेल्या पुर्व मान्सून पाऊस झाल्याने ह्या ठिकाणी हि शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.

Previous articleउपचारासाठी मदतीचे आवाहन
Next articleचंद्रकांत शिंदे यांच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क , सेनीटायझरचे वाटप