लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत अन्नधान्य वाटप

दिनेश पवार,दौंड

लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील मसनरवाडी, येडेवाडी, जगताप मळा,मेरगळमळा,शाहुनगर (जगदाळे वस्ती)ह्या,वाडया वस्त्या वरती गरजू व्यक्तींना मसनरवाडी पोलीस पाटील अश्विनी बगाडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप येडे यांच्या तर्फे अन्नधान्य चे वाटप करण्यात आले.

यावेळी लिंगाळी ग्रामपंचायत चे सरपंच सुनिल जगदाळे पाटील, उपसरपंच-वैजंता सुधाकर चितारे , ग्रामपंचायत सदस्य-अँड संदिप मुरलीधर येडे,संजय येडे, सचिन हगारे,आशा सेविका मालन येडे,मसनरवाडी पोलीस पाटील-अश्विनी विजय बगाडे व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कोरोना माहामारी विषयी आरोग्याची काळजी घ्यावी,शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले

Previous articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने किराणा किटचे वाटप
Next articleदेऊळगाव राजे कोविड सेंटरला आमदार कुल यांची भेट