देऊळगाव राजे कोविड सेंटरला आमदार कुल यांची भेट

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर ला दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली, तसेच येथील एक वार्ड बॉय व लॅब टेक्निशियन ही लगेच भरण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात येईल असेही सांगितले.

यावेळी वडगाव दरेकर येथील संजय बाराते यांनी कोविड सेंटर साठी पाच हजार रुपये देणगी दिली,येथील रुग्णांना जास्त लक्षणे दिसू लागली तर त्यांना देऊळगाव गाडा येथील कोविड सेंटर ला पुढील उपचारासाठी पाठवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले यावेळी दौंड तालुका किसान मोर्चा चे तालुका अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर, हरिभाऊ ठोंबरे, कानिफनाथ सूर्यवंशी,पंकज बुऱ्हाडे, कपिल माने,हेमंत कदम,हरी खेडकर,देऊळगाव राजे प्राथमिक वैद्यकीय अधिकारी सुमित सांगळे,येथील कोविड सेंटर प्रमुख डॉ.मयूर वाहुळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleलिंगाळी ग्रामपंचायत हद्दीत अन्नधान्य वाटप
Next articleसमाजातील संवेदनशील नागरिकांकडून सामाजिक भावनेतून कोविड सेंटरला मदत