पेठ येथे एकास कुर्‍हाडीने मारहाण

प्रमोद दांगट,निरगुडसर

पेठ (ता.आंबेगाव ) येथे घराचे बांधकाम चालू असलेल्या बांधकाम साहित्याचे मोटरसायकलने नुकसान केलेली कारणावरून बडबड केल्याने येथील अनिल शांताराम बुट्टे यांना मारहाण केल्याचा घटना घडली असून या बाबतची फिर्याद त्यांची पत्नी दिपाली अनिल बुट्टे ( रा.पेठ बुट्टेवस्ती ता.आंबेगाव ,पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अनिल शांताराम बुट्टे ( रा.पेठ ता.आंबेगाव पुणे ) यांचे पेठ येथे घराचे काम सुरू असून त्यांच्या घरासमोर बांधकामाचे साहित्य मोकळ्या जागेत टाकले आहे. त्या साहित्यावरून ओमकार रामचंद्र बुट्टे हा त्याची मोटरसायकल घेऊन जाऊन साहित्यांचे नुकसान करत असल्याने दि. २३/५/२१ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अनिल बुट्टे हे दारू पिऊन आले व बांधकामाचे साहित्याचे नुकसान केले म्हणून बडबड करत होते या साहित्याचे नुकसान भरपाई कोण देणार असे बोलत असताना त्या ठिकाणी रामचंद्र गुलाब बुट्टे व त्यांचा मुलगा ओमकार रामचंद्र बुट्टे तेथे आले व तू कोणाला उद्देशून बोलतो तुझे नुकसान आम्ही केले आहे का ? असे म्हणत शिवीगाळ दमदाटी करून त्यांना मारहाण केली त्यावेळी ओंकार यांनी त्याच्या हातात असलेल्या कुऱ्हाडीने अनिल बुट्टे याला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अनिल बुट्टे यांची पत्नी दिपाली बुट्टे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

Previous articleपहिलवान मंगलदास बांदल यांना अटक
Next articleथोरांदळे येथे महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ