थोरांदळे येथे महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रमोद दांगट, निरगुडसर

रांजनी (ता.आंबेगाव) येथे बाजरी पिकाचे राखण करण्यासाठी आलेल्या ठाकर समाजाच्या महिलेचा थोरांदळे गावच्या हद्दीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली असून या महिलेच्या डोक्यात व चेहऱ्यावर कुणीतरी हत्याराने वार व मारहाण करून खून केला असल्याचे दिसून येत आहे.या बाबत नंदाबाई पोपट केदार ( रा.हिवरगाव संगमनेर ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला व तिचे कुटुंब दरवर्षी संगमनेर येथून आंबेगाव तालुक्यातील रांजनी भागात कामासाठी येत असतात मयत द्रोपदाबाई हरिभाऊ गिरहे वय 32 फिर्यादी महिलेची मुलगी असून द्रौपताबाई तिचा मुलगा व फिर्यादीचा मुलगा हे दि.२५ रोजी रांजनी येथील बाळू वाघ यांच्या शेतात बाजरी काठण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते रात्री घरी आले असता रात्री जेवणानंतर द्रोपदाबाई हिने सांगितले की मांजरवाडी येथील पाहुण्यांचा फोन आला असून त्यांनी भाजीपाला आणला आहे तो घेऊन येते असे म्हणून ती घराच्या बाहेर गेली रात्री उशीरापर्यंत ती आली नसल्याने तिच्या घरच्यांनी ती मांजरवाडी येथे गेली असेल म्हणून ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी दि 26 रोजी द्रोपदाबाई घरी न आल्याने फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांनी तिला फोन केला असता तो लागला नाही तसेच तिचा रांजनी भागात शोध घेतला असता ती मिळाली नाही. त्यानंतर सकाळी दहा वाजता थोरांदळे गावच्या हद्दीत हॉटेल सरगम च्या पाठीमागील बाजूस तीस ते पस्तीस वर्षाची महिला मृत अवस्थेत मिळून आली असल्याचे लोकांकडून समजल्यानंतर फिर्यादी व तिच्या कुटूंबियांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळखून तो मृतदेह द्रोपदाबाई हरिभाऊ गिरहे ( वय 32 रा.हिवरगाव गिरेवाडी ता.संगमनेर जि. अहमदनगर ) ,असल्याची खात्री केली तिची पाहणी केली असता तिच्या डोक्यावर कोणत्यातरी हत्याराने मारहाण करत गंभीर स्वरुपाच्या जखमा झालेल्या दिसत होत्या. यावरून द्रौपताबाई हिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी कारणावरून हत्याराने मारहाण करून खून केला असल्याचे प्रार्थमिक तपासात दिसत आहे. याबाबत नांदत बाई केदार यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.दरम्यान पुणे जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत.

Previous articleपेठ येथे एकास कुर्‍हाडीने मारहाण
Next articleनारायणगाव ,वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ