पहिलवान मंगलदास बांदल यांना अटक

पुणे जिल्ह्यातील राजकारणातील महत्वाचे नेते असलेले पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल यांना नुकतीच शिक्रापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे मागील आठवड्यात पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल यांच्या सह त्यांच्या भावावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सदर प्रकरणात त्यांना न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केलेला असताना आज (बुधवार) चौकशीसाठी बांदल यांना शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये बोलाविण्यात आले होते.
यामध्ये महत्वाची गोपनीयता बाळगत पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. मात्र, अटक केल्यानंतर तातडीने शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मंगलदास बांदल यांना शिरूर पोलिस स्टेशनच्या कोठडीत रवाना केले आहे. त्यांच्यावर शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून फिर्यादीच्या नावे खोटे खरेदीखत करून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून आठ लाख रुपये कर्ज काढून मंगलदास बांदल यांनी वापरले त्याच प्रमाणे कुलमुखत्यार पुरवणी दस्त तयार करून शिवाजीराव भोसले सहकारी बँक एकूण एक कोटी 25 लाख रुपये कर्ज काढल्याचे समोर आले आहे. ते अनेक दिवस न भरल्यामुळे ते आता तब्बल दोन कोटी पन्नास लाख रुपये झाले आहेत. त्यामुळे फिर्यादी दत्तात्रय मांढरे यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे गुन्ह्यात आरोपी असणारे मंगलदास बांदल यांना अटक केली, असून शिक्रापूर पोलिसांनी त्यांना अटक करून लगेच त्यांची रवानगी शिरूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत शेडगे यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शी बोलताना म्हणाले परिसरातील नागरिकांना जर अशा प्रकारची फसवणूक जर कोणाची झाली असेल. त्यांनी समोर यावे निसंकोच शिक्रापूर पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा सर्वांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार असून गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.

Previous articleगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता सचिन जाधव यांची हत्या
Next articleपेठ येथे एकास कुर्‍हाडीने मारहाण