गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता सचिन जाधव यांची हत्या

प्रमोद दांगट, निरगुडसर

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आणि आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले सचिन जाधव ( रा.धामणी ता.आंबेगाव ) यांची हत्या झाली असून ही पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाली असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या पोंदेवाडी फाट्यावर या घटनेची सुरुवात झाली. मंगळवारी रात्री सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झालं. जाधव यांनी दिलेले पैसे ते परत करत नव्हते यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद शिगेला पोहोचला होता. यातूनच काल थिटे आणि सुर्यवंशीने त्यांची हत्या केली.तिथून सचीन जाधव यांच्या गाडीत त्यांचा मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने घेऊन गेले. पुणे जिल्हा संपताच नगर जिल्ह्यातील कोरठन घाटातील दरीत हा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथंच जवळपास सोडून दिली. पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. दुसरीकडे जाधव घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने तपास सुरू झाला आणि आज जळालेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरताच थिटे आणि सूर्यवंशी यांना पोलिसांनि बेड्या ठोकल्या आहेत.

Previous articleअहिल्याबाई होळकर जयंती घरीच साजरी करावी-संदीपान वाघमोडे
Next articleपहिलवान मंगलदास बांदल यांना अटक