अहिल्याबाई होळकर जयंती घरीच साजरी करावी-संदीपान वाघमोडे

दिनेश पवार,दौंड

कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती आहे, यावर्षी सण,उत्सव,जयंती अत्यंत साध्यापणाने साजरी करण्यात आले आहे, यावर्षी ची 296 वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करत आपल्या घरीच साधेपणाने साजरी करावी असे आवाहन पुण्यश्लोक महाराणी देवी अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव समिती दौंड शहर व तालुका अध्यक्ष संदीपान महादू वाघमोडे यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे आहे, त्यांनी धर्मशाळा,पाणपोई, मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण कार्य केले आहे त्यांच्या कार्याचा आदर्श घेत ही जयंती साधेपणाने घरी साजरी करावी असे वाघमोडे यांनी आवाहन केले आहे

Previous articleदौंड मध्ये शिवसैनिकांकडून एक घास आपुलकीचा उपक्रम
Next articleगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता सचिन जाधव यांची हत्या