दौंड मध्ये शिवसैनिकांकडून एक घास आपुलकीचा उपक्रम

दिनेश पवार,दौंड

दौंड शहरातील शिवसैनिकांनी लोकसहभागातून गरजू लोकांसाठी एक घास आपुलकीचा या नाविन्यपूर्ण सुरू केलेल्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

लॉकडाऊन च्या काळात सर्वत्र बंद असल्याने गरजू व्यक्तींच्या गरजा लक्षात घेवून अमोल जगताप,संदीप बारटक्के, शैलेश पिल्ले,राकेश भोसले यांनी दौंड शहरात एक घास आपुलकीचा हा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमात दररोज दुपारी एक वेळ चे जेवण दिले जाते,गेली 15 दिवसापासून 100 ते 150 गरजूंना हे जेवण दिले जाते यामुळे उपासमारीची वेळ आली होती ती थांबवण्यासाठी हे सामाजिक कार्यकर्ते मदत करत आहेत यासाठी समाजातील कित्येक दानशूर व्यक्ती या उपक्रमास मदत करत आहेत.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल मदने,धनंजय ताठे, कुंडलिक चुंबळकर सोनू बलांडे यांचे सहकार्य लाभत आहे,सदर उपक्रम अनिल तात्या सोनवणे,संतोष जगताप,रमेश निवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous articleसलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत
Next articleअहिल्याबाई होळकर जयंती घरीच साजरी करावी-संदीपान वाघमोडे