वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना अनिल कोतवाल यांची मदत

अमोल भोसले,उरुळी कांचन

वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक लोक गरजू लोकांना मदत करत असतात अशाच पद्धतीने पूर्व हवेलीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल कोतवाल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा अवास्तव खर्च टाळून सामाजिक उपक्रम पार पाडले.

यामध्ये शिंदवणे गावामधील कड डीपी नंबर १ वरील शेती पंपांच्या कनेक्शनला चांगला लोड मिळण्यासाठी व ट्रान्सफार्मर जाऊ नये म्हणून कॅपिशिटर बसवून मेंटेनन्सचे काम करून दिले. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत त्यांनी पुणे येथील स्नेहछाया परिवारातील विध्यार्थ्याना व अंध शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नदान केले. कोरोना काळ असल्याने सध्या समाजातील सगळ्याच वर्गांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे अशावेळी समाजासाठी उभे राहून परिसरात त्यांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे.

Previous articleकोविड केअर सेंंटर मध्ये वृक्षारोपण
Next articleजरेवाडी येथे हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांची प्रात्यक्षिके