जरेवाडी येथे हुमणी किड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांची प्रात्यक्षिके

राजगुरूनगर- महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत जरेवाडी (ता.खेड) येथे हुमणी(उन्नी) किड नियंत्रण करण्यासाठी प्रकाश सापळ्यांची प्रात्यक्षिके नुकतीच घेण्यात आली. किसन रामभाऊ राक्षे,विजय धोंडीबा टाकळकर, देवराम शंकर राक्षे यांचे शेतावर हुमणी किड नियंञणासाठी प्रकाश सापळ्यांची प्रात्यक्षिके घेण्यात आली.


जरेवाडी येथे सरासरी ७० हेक्टर क्षेञावर खरीप बटाटा पिक घेतले जाते, बटाटा हे येथील मुख्य नगदी पिक आहे. हुमणी किडीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते हे नुकसान टाळण्यासाठी व हुमणी किडी नियंत्रण करण्यासाठी मे व जुन महिने अतिशय महत्त्वाचे आहेत.पहिल्या वळवाच्या पावसानंतर हुमणी किडीचे भुंगरे सांयकाळी कडुलिंब बोर व बाभळीच्या झाडावर जमा होतात,झाडांच्या पाल्यावर उपजिविका करतात. राञी नर भुंगरे व मादी भुंगरे यांचे मिलन होते व अंडी घालतात नेमकी हिच वेळ साधून हुमणीचे भुंगरे हे निशाचर असल्याने राञी फिरतात ,हुमणीच्या भुंगरे पकडण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले शेतातील बांधावरील झाडाखाली जमीनीपासुन दोन ते तिन फुट उंचीवर विद्युत बल्ब लावावेत व त्याखाली राँकेल मिश्रीत पाणी ठेवावे. हुमणीचे भुंगेरे राञीचे वेळी प्रकाशाकडे आकर्षित होऊन , पाण्यात पडतात. यामुळे कमी खर्चात हुमणी किडीचे नियंत्रण शक्य असून शेतकऱ्यांनी मोहीम स्वरुपात या प्रकाश सापळ्यांचा वापर करुन हुमणी किड नियंञण शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन खेडचे तालुका कृषि अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी केले होते

मांदळे यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत जरेवाडी येथील किसन रामभाऊ राक्षे,देवराम शंकर राक्षे व विजय धोंडीबा टाकळकर या शेतकऱ्यांनी त्यांचे शेतात कृषि सहाय्यक सौ कविता रोडे यांचे मार्गदर्शनाखाली हुमणी किडीचे भुंगेरे पकडण्यासाठी प्रकाश सापळे (लाईट ट्रँप्स ) प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत.

यावेळी जरेवाडी येथील उपस्थित शेतकऱ्यांना म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड,नँडेपखत युनिट गांडुळखत युनिट उभारणी करणे.तसेच सद्याचे कोराना महामारीचे संकट काळात शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खते वाटप व कृषि विभागाकडील विविध योजना बाबतचे मार्गदर्शन कृषि सहाय्यक सौ कविता रोडे यांनी केले. मंगेश राक्षे यांचे मुरघास युनिट व डी कंपोस्ट युनिटची पहाणी करुन मार्गदर्शन केले.

यावेळी जरेवाडी गावच्या पोलिस पाटील सौं अश्विनी राक्षे,विलास जरे,निलेश बबन जरे ,मारुती देवराम जरे व इतर महिला शेतकरी उपस्थित होते.

Previous articleवाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना अनिल कोतवाल यांची मदत
Next articleमळवंडी ठुले येथील नागरिकांना धान्य वाटप