Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
तळेगांव दाभाडे- येथील राष्ट्रीय सुगी पच्छात केंद्रामध्ये प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंंटर सुरू करण्यात आले आहे. या मध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत असुन रुग्णाच्या हस्ते प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना रुग्नाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.
कोविड केअर सेंटरच्या मोकळ्या जागेमध्ये चिंच,करंज, काशीद, बेहडा,तुळस,गवतीचहा,सीताफळ, आवळा,या सारख्या वनोषधींने वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामध्ये बहुतेक वनोषधींचे वृक्षारोपण हे बहुतेक विविध आजारांवर गुणकारी औषध म्हणून वापरण्यात येत आहे.

यावेळी प्रत्येक लावलेल्या झाडाच्या खाली कोरोना रुग्नाच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. या ठिकाणी उपचारासाठी दाखल असलेले अनेक रुग्ण हे वृक्षप्रेमी आहे.यावेळी मयुर झोडगे,कोरोना रुग्ण,डाँक्टर, नर्सेस व केंद्रातील स्टाफ उपस्थित होता.
Download WordPress Themes Nulled and plugins.