वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सरपंचाची कोविड केअर सेंटरला मदत

दिनेश पवार ,दौंड

वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत बोरिबेल ग्रामपंचायतचे सरपंच नंदकिशोर पाचपुते यांनी कोविड केअर सेंटर देऊळगाव राजे येथे वाफेच्या मशीन, ऑक्सिमीटर मशीन देऊन ४१ वा वाढदिवस साजरा केला, कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र परिस्थिती भीतीदायक स्वरूपाची निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागात सध्या रुग्ण संख्या मोठयाप्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे अशा पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व संस्था पुढे येत मदत करत आहेत, म्हणून मीसुद्धा माझा वाढदिवस अशा विधायक उपक्रमाने साजरा केला असे मत सरपंच नंदकिशोर पाचपुते यांनी व्यक्त केले.

यावेळी हरी खेडकर सर,प्रा.सुदर्शन गिरमकर,कपिल पवार, राजू पाचपुते,निखिल सूर्यवंशी,परिचारिका सुनीता चव्हाण,अजय घेगडे उपस्थित होते

Previous articleकोरेगाव मुळ येथील कोविड केअर सेंटरला पोलीस मिञ संघातर्फे फळवाटप
Next articleकोरेगावमुळ कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्याप्रकारे सुविधा उपलब्ध