कोरेगाव मुळ येथील कोविड केअर सेंटरला पोलीस मिञ संघातर्फे फळवाटप

दिनेश पवार

कोरोना काळामध्ये लोकजनतेला कोविड काळामध्ये मदत व्हावी यासाठी शिरुर हवेलीचे कार्यक्षम आमदार अशोक बापु पवार व जि.प.सदस्या सुजाता पवार यांच्या प्रेरणेतुन आणि रावलक्ष्मी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविड सेंटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.माणुसकीच्या नात्याने सामाजिक जाणिव या हेतुने पोलीस मिञ संघ महाराष्ट्र राज्य संचलित पोलीस मिञ संघ ड्रिम्स निवारा या शाखेने कोविड सेंटरला दाखल झालेल्या पेशंटला कलिंगड,चिक्कु, खरबुज, संञी,या फळांचे २५ ते ३० लोकांना वाटप करण्यात आले.

सदरचे फळ वाटप कोरेगाव मुळ ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल नाना शितोळे,ग्रामपंचायत सदस्य दत्ताञय काकडे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.यावेळी मोफत फळवाटप करणारे पोलीस मिञ संघाचे पदाधिकारी सदस्य सौ.आरती मुन,सौ.प्रशांती साळवे,मनिषा कुंभार,रविंद्र गायकवाड,संजय साळवे,अश्वीन मुन,अमोल गजरमल,अतुल वाघमारे,गौरव शिरसाठ,सुगत कांबळे,शंकर अहिवळे यांनी फळ वाटपासाठी योगदान दिले.

 अश्वीन मुन यांनी ग्रामपंचायत कोरेगाव मुळचे सरपंच,उपसरपंच, सदस्य,आणि कर्मचारी वर्ग हे कोविड सेंटरचे व्यवस्थापन चोख पध्दतीने करत आहेत.जेवन नास्ता चहाची उत्तम व्यवस्था केली आहे याबद्दल मनापासुन आभार मानले.तर पोलीस मिञ संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यांनी अशोक बापु पवार, जि.प.सदस्या सुजाता पवार आणि रावलक्ष्मी फौंडेशनचे मोफत कोविड सेंटर कोरेगाव मुळ येथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.

यावेळी नर्सरी उद्योग समुहाचे अध्यक्ष दिलीप शितोळे,प्रविण शितोळे तज्ञ सल्लागार वि.वि. कार्य.सोसा.कोरेगाव मुळ हे मान्यवर उपस्थित होते.

Previous articleलॉकडाऊन काळात जुगार खेळणाऱ्याची दौंड पोलिसांकडून धुलाई
Next articleवाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सरपंचाची कोविड केअर सेंटरला मदत