कोरेगावमुळ कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्याप्रकारे सुविधा उपलब्ध

कोरेगावमुळ-रावलक्ष्मी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी सर्व सामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने कोविड सेंटर चालू करण्यात आले आहे.

प्रशासना बरोबर विविध सामाजिक संस्था, तरुण वर्ग, हॅप्पी गुप्र, ठिकठिकाणी काही ना काही तरी सामाजिक भावनेतून त्याठिकाणच्या कोविड सेंटरला मदत करतात. आमदार अशोक पवार तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांचा एकच उद्देश रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी तसेच चांगला आहार मिळावा म्हणून विशेष लक्ष केंद्रित प्रत्येक कोविड सेंटर वर यांनी केले आहे. कोरेगावमुळचे सरपंच विठ्ठल शितोळे हे आपल्या सर्व सहकारी मित्राच्या समवेत सातत्याने कोविड सेंटरवर लक्ष देऊन हजर असतात .

यावेळी उपसरपंच मनिषा कड, ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब बोधे, भानुदास जेधे, दत्तात्रय काकडे, मंगेश कानकाटे, माजी चेअरमन अमित सावंत, आप्पा कड, प्रविण शितोळे, शिवसेना नेते दिलीप शितोळे, कार्यालयाचे मालक अमोल भोसले, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, भाऊसाहेब चौधरी, मंगेश शितोळे, सुहास चौधरी सह अन्य मित्रपरिवार ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी याचेही विशेष सहकार्य कोविड सेंटरला लाभत आहे.

उरुळी कांचन येथील कै.चंद्रकांत भिकू काळे यांच्या स्मरणार्थ शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कांतीलाल चंद्रकांत काळे व शुभम कांतीलाल काळे, जयेश कांचन यांच्याकडून यशोदा मंगल कार्यालयातील “प्रतिभा कोविड सेंटरला” “ड्रायफूट रबडी” देण्यात आली. तसेच येथील जेष्ठ व्यावसायिक रमेश जुन्नरकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविण जुन्नरकर (स्पारकल अॅक्वा) यांच्या तर्फे कोविड सेंटरला “२० पाणी बाॅक्स” देण्यात आलं आहे.

कोरेगावमुळ गावातील डिम्स निवारा येथील पोलीस मित्र संघटनेच्यावतीने वतीने श्रीप्रयागधाम हॉस्पिटल व कोविड सेंटर मधील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी मोफत फळवाटप करणारे पोलीस मिञ संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर, सदस्य आरती मुन, प्रशांती साळवे, मनिषा कुंभार, रविंद्र गायकवाड, संजय साळवे, अश्वीन मुन, अमोल गजरमल, अतुल वाघमारे, गौरव शिरसाठ, सुगत कांबळे, शंकर अहिवळे, यांनी फळ वाटपासाठी योगदान दिले.

हॅप्पी ग्रुपचे मार्गदर्शक राहुल काकडे यांच्यातर्फे “प्रतिभा आरोग्य मंदिर येथील कोविड सेंटरच्या” रुग्णांना दोनशे अंडी भेट देण्यात आली.

Previous articleवाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सरपंचाची कोविड केअर सेंटरला मदत
Next articleग्रामीण भागात लसीकरण तातडीने सुरू करण्याची सरपंच संध्या चौधरी यांची मागणी