लायन्स क्लब तर्फे होमीयोपेथी आर्सेनिक अल्बम 30 औषध व मास्क चे मोफत वाटप

पुणे : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लायन्स  क्लबच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरच्या वतीने होमीयोपेथी आर्सेनिक अल्बम 30 व मास्कचे मोफत वितरण करण्यात आले आहे.
पुण व पिंपरी चिंचवड शहरात कोरोना माहामारीचा प्रभाव अधिक प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे आपली सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरच्या वतीने प्रतिकार शक्ती वाढविणारे होमीयोपेथी आर्सेनिक अल्बम 30 औषध आणि मास्कचे हजारो लोकांना मोफत वाटप करण्यात आले आहे. हे औषध वाटप पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात आले .

यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरचे अध्यक्षपद भीमसेन अग्रवाल, उपाध्यक्ष पदी राजेश अग्रवाल, सचिव पदी रोहित गुप्ता, कोषाध्यक्ष अशोक बंसल, पीआरओ रवि सातपुते, सल्लाहगार समिती अध्यक्ष अशोक अग्रवाल सहीत आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleगावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य किंवा पदाधिकारी वगळता ग्रामपंचायतीवर स्थानिक पोलिस पाटील हेच प्रमुख दावेदार
Next articleसहा तासातच आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून तात्काळ डिपी बसविला